ट्रम्प यांची उद्दिष्टे –
\nट्रम्प यांनी या कारवाईची चार प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली. इराणची क्षेपणास्त्र निर्मिती उद्ध्वस्त करणे, इराणी नौदल नष्ट करणे, इराण पुरस्कृत सशस्त्र गटांना खिळखिळे करणे आणि इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखणे. इराणी लष्करी कर्मचाऱ्यांनी शस्त्रे टाकल्यास माफी देण्याचे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले. ही कारवाई अनेक दिवस सुरू राहणार असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.
\n\n\nOPERATION EPIC FURY 🇺🇸
\n— Department of War 🇺🇸 (@DeptofWar) February 28, 2026
\nइराणचे प्रत्युत्तर –
\n
\nइराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, त्यानंतर मध्यपूर्वेतील अमेरिकी तळांवरही हल्ले केले. कतारचा अल उदैद तळ, कुवेतचा अल सालेम तळ, UAE चा अल धाफ्रा तळ आणि बहरीनमधील अमेरिकी फिफ्थ फ्लीट मुख्यालय यांना लक्ष्य करण्यात आले. सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधील अमेरिकी तळांवरही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या संसदेतील सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अझिझी यांनी “आम्ही इशारा दिला होता, आता या मार्गाचा शेवट तुमच्या नियंत्रणात नाही,” असे सांगितले.
इराणचे नेते कुठे आहेत?
\n
\n८६ वर्षीय खामेनी अनेक दिवसांपासून सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अध्यक्ष मसूद पेझेश्कियान सुरक्षित असल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.
हल्ल्याचे समर्थन कशावर?
\n
\nइराणचा अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमता हा इस्रायल व अमेरिकेसाठी अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे दोन्ही देशांनी म्हटले आहे. ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणने युरेनियम साठवणूक शून्यावर आणण्यास आणि IAEA तपासणीस तत्त्वतः मान्यता दिली होती. मात्र त्याआधीच हे हल्ले झाले.
\n\nI am dismayed. Active and serious negotiations have yet again been undermined. Neither the interests of the United States nor the cause of global peace are well served by this. And I pray for the innocents who will suffer. I urge the United States not to get sucked in further.…
\n— Badr Albusaidi – بدر البوسعيدي (@badralbusaidi) February 28, 2026
\nजगाची प्रतिक्रिया –
\n
\nफ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी “हा संघर्ष जागतिक शांततेसाठी गंभीर धोका असून तो थांबणे आवश्यक आहे,” असे सांगितले. EU च्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कॅलास यांनी परिस्थिती “अत्यंत धोकादायक” असल्याचे म्हटले. ओमानने वाटाघाटी “पुन्हा एकदा उधळल्या गेल्या” असे सांगत नाराजी व्यक्त केली. भारताने संयम बाळगण्याचे आवाहन केले असून कॅनडाने इराणला अण्वस्त्र मिळण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. रशियाने मात्र अमेरिकेवर वाटाघाटींचा “आडपडदा” म्हणून वापर केल्याचा आरोप केला.
आजच्या हल्ल्यांमध्ये किती मृत्यू ?
\nसर्वाधिक नुकसान इराणमध्ये –
\n
\nमिनाब शहरातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात सर्वाधिक हानी झाली. CNN च्या वृत्तानुसार मिनाबच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांचा आकडा किमान ६३ विद्यार्थ्यांवर पोहोचला असून ९२ जखमी आहेत आणि अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. CNNने फार्स न्यूज एजेंसीच्या हवाल्याने मिनाब आणि जस्क येथे एकूण ७० ठार आणि ९० जखमी झाल्याचे नमूद केले आहे.
इराणचे लष्करी नेते –
\nरॉयटर्सने इस्रायली लष्करी आणि प्रादेशिक सूत्रांच्या हवाल्याने संरक्षणमंत्री अझिझ नासिरझादेह आणि IRGC कमांडर मोहम्मद पाकपूर हे इस्रायली हल्ल्यात ठार झाल्याची शक्यता वर्तवली आहे. इराण इंटरनॅशनलने संरक्षण परिषदेचे प्रमुख अली शामखानी ठार झाल्याचे सांगितले. मात्र इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकसान “फारसे मोठे नाही” असे म्हटले आहे. काही वृत्तांनुसार खामेनी जिवंत आहेत. वरील नेते ठार झाले की जिवंत आहेत याबाबत वेगवेगळे दावे आहेत.
इराकमध्ये –
\n
\nइराकमध्ये बगदादच्या दक्षिणेस जुर्फ अल-सखर येथे इस्रायली हल्ल्यात पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेसचे दोन लढवय्ये ठार आणि तीन जखमी झाले.
UAE मध्ये –
\n
\nअबुधाबीत इराणच्या क्षेपणास्त्राचे तुकडे पडून एका आशियाई देशाच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचे UAE च्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले जात आहे.
इस्रायलमध्ये –
\n
\nइराणच्या प्रत्युत्तरी हल्ल्यात इस्रायलमध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये अपार्टमेंट इमारती, दोन विद्यापीठे आणि एक रुग्णालय यांचे मोठे नुकसान झाले. २८ जण ठार आणि हजारो जखमी झाले असल्याचेही काही वृत्तांमध्ये सांगितले जात आहे.
अमेरिकी सैनिक –
\nअद्याप कोणत्याही अमेरिकी सैनिकाच्या मृत्यूची अधिकृत नोंद नाही, मात्र ट्रम्प यांनी आधीच अमेरिकी जीवितहानीची शक्यता मान्य केली आहे.
लक्षात घ्या: युद्ध सुरू असल्याने हे आकडे वेगाने बदलत आहेत. इराण सरकारी माध्यमे आणि इस्रायल-अमेरिकी अधिकारी यांच्या आकड्यांमध्ये तफावत असू शकते.
\nआर्थिक परिणाम –
\nया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या असून होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत होण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे.