Urvashi Rautela Birthday Gold Cake : सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला कधी तिच्या महागड्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या भरमसाठ फीमुळे चर्चेत असते. आगामी प्रोजेक्ट व्यतिरिक्त उर्वशीचे नाव तिच्या लक्झरी जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत येते. सध्या ती तिच्या वाढदिवसाच्या केकमुळे चांगलीच चर्चेत आहे.
उर्वशी रौतेला 25 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांची झाली. अभिनेत्रीने ‘लव्ह डोस 2’ च्या सेटवर हनी सिंगसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्री तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सोन्याचा केक कापून चर्चेत आली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक असल्याचे म्हंटले आहे याची किंमत लाखोंच्या घरात आहे. | Urvashi Rautela Birthday Gold Cake
उर्वशी रौतेलाने सोन्याचा केक कापला
हेट स्टोरी 4 फेम उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री हनीसोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. ती थ्री-लेअर 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक कापताना दिसत आहे. वाढदिवशी उर्वशीने रेड साइड कट ड्रेस परिधान केला होता. | Urvashi Rautela Birthday Gold Cake
हनी सिंगसाठी एक नोट लिहिली
फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लव्ह डोस 2 च्या सेटवर वाढदिवस समारंभ. धन्यवाद हनी सिंग, तुमची उपस्थिती माझ्या प्रवासाच्या टेपेस्ट्रीमध्ये कृतज्ञतेच्या धाग्याने विणलेली आहे. तुमचे अथक प्रयत्न आणि खरी काळजी. तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. | Urvashi Rautela Birthday Gold Cake
View this post on Instagram
उर्वशी रौतेला शेवटची स्कंदमध्ये दिसली होती. सध्या ती एका साऊथ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. उर्वशी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिची फॅन फॉलोइंग इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे. इन्स्टाग्रामवर 70 मिलियनहून अधिक लोक तिला फॉलो करतात.