केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे वर्ल्डकपबाबत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

नवी दिल्ली – आशिया करंडक स्पर्धेत जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळला नाही तर आम्हीही भारतातील विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार नाही, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी दिला होता. त्यावर ही स्पर्धा तुमच्या सहभागाशिवायही यशस्वी होईल, अशा शब्दात भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी राजा यांची खिल्ली उडवली आहे.
#NZvsIND | ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला खेळवत नाही; शिखर धवनने स्पष्टच सांगितले!
यंदाच्या आशिया करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावजन्य परिस्थितीमुळे या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, भारतातील केंद्र सरकारने परवानगी दिली तरच भारतीय संघ पाकिस्तानमध्ये दाखल होत ही स्पर्धा खेळेल, असे मत बीसीसीआयने व्यक्त केले होते.
#NZvsIND | ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला खेळवत नाही; शिखर धवनने स्पष्टच सांगितले!
मात्र, त्यावर पाकिस्तान मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन आशिया स्पर्धेत खेळला नाही तर पाकिस्तानचा संघही भारतात 2024 साली होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार नाही, असे राजा यांनी म्हटले होते. त्यावर ठाकूर यांनी रोखठोक मत व्यक्त केले. आज जागतिक क्रिकेटमध्ये भारत सुपरपॉवर बनला आहे त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धा यशस्वी होईल व पाकिस्तानचा संघ त्यात खेळला नाही तरीही काहीही फरक पडणार नाही, असे ठाकूर यांनी राजा यांना सुनावले आहे.





