Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग नवव्यांदा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करत आहेत. नुकतेच निर्मला सीतारमण यांनी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले आहे. संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांगितले की, देशांतर्गत उत्पादन क्षमता उभारण्यात आली असून ऊर्जा सुरक्षाही अधिक मजबूत करण्यात आली आहे. सरकारने लोकप्रियतेपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य दिले आहे. केवळ भाषणबाजीऐवजी सरकारने ठोस सुधारणा राबवल्या आहेत. तीन कर्तव्याचा उल्लेख याबाबत त्यांनी सरकारच्या तीन कर्तव्याचा उल्लेख केला आहे. त्यातील पहिलं कर्तव्य म्हणजे आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि तो वेग कायम ठेवणं. यासाठी उत्पादकता व स्पर्धात्मकता वाढवणं. जागतिक स्तराच्या सुविधा निर्माण करणं आहे. Budget 2026: संत रविदासांचे नाव घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भाषणाला सुरुवात दुसरं कर्तव्य म्हणजे आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं, त्यांचं कौशल्य वाढवणं, त्यांच्या क्षमता वाढवणं व भारताच्या समृद्धतेच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेणं आणि सबका साथ, सबका विकास या तत्वावर आधारित विकास साध्य करणं. यातून प्रत्येक कुटुंब, समाज, प्रदेश यांना साधन-संपत्ती, सुविधा व संधी समान पद्धतीने उपलब्ध असतील, हे तिसरे कर्तव्य असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले आहे. हेही वाचा : Union Budget 2026: “आम्हाला फारशा अपेक्षा नाहीत, पण…”; अर्थसंकल्पापूर्वी प्रियंका गांधींची प्रतिक्रिया