राष्ट्रवादीचा अवघ्या एका ग्रामपंचायतीवर झेंडा
दौंड: दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात येथे पार पडली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत या 8 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायती या आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांच्या ताब्यात होत्या. मात्र, या पंचवार्षिकमध्ये त्यातील सहा ग्रामपंचायती कुल समर्थकांनी ताब्यात घेतल्या आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थकांना फक्त एकाच ग्रामपंचायतीत सरपंचपदी सत्ता मिळाली असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दौंड तालुक्यात मोठा धोबपछाड मिळाला आहे. तर एका ग्रामपंचायतीचे सरपंचपद अपक्षाकडे गेले आहे.
दौंड तालुक्यामध्ये नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, पाटेठाण, डाळिंब, बोरीभडक, दापोडी, लोणारवाडी आदी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थक आणि माजी आमदार रमेश थोरात समर्थक यांच्यामध्ये सर्व ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्या. मंगळवारी पहिल्या टप्प्यामध्ये चार आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये चार ग्रामपंचायतींच्या मतदानाची मोजणी झाली.
ग्रामपंचायत निहाय सरपंच
देवकरवाडी : तृप्ती मगर, दहिटणे : आरती गायकवाड, नांदूर : युवराज बोराटे, बोरीभडक : कविता कोळपे, लोणारवाडी : प्रतीक्षा हिवरकर (सर्व कुल समर्थक). दापोडी : आबासाहेब गुळमे (थोरात समर्थक). डाळिंब : बजरंग म्हस्के (अपक्ष).