उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष, रणनीती ठरणार?
Uddhav Thackeray | दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. Uddhav Thackeray |
इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. त्याच बरोबर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर आगामी निवडणूकीत भाजपविरोधी वातावरण तयार करण्याबाबतही चर्चा होऊ शकते. Uddhav Thackeray |
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा कसा असेल?
- 6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचणार.
- त्यानंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहचतील.
- 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
- 6 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत.
- 7 ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पत्रकार परिषद घेतील.
- सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला भेट देतील.
- 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. Uddhav Thackeray |
हेही वाचा :





