एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंच्या आधी साधलेल्या अचूक टायमिंगची चर्चा सुरु

Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यात जाण्याआधीच एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजता शिंदेंचे दिल्लीमध्ये आगमन होईल. उद्या दिवसभर दिल्लीतील विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसोबत इतरही काही बैठकांमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.
एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीची बैठक बुधवारी असल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला येणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधीच शिंदेंचा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Eknath Shinde |
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अद्याप शिंदेंच्या बैठकांची माहिती समोर आली नाही. मात्र राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील स्थान व जागावाटपामध्ये घेतली जाणारी भूमिका यासंदर्भात या भेटीगाठी होत असल्याचं बोललं जात आहे. Eknath Shinde |
एका आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीकडे रवाना
काही दिवसांपूर्वीच शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर राज्यात अनेक तर्कवितर्क लावले गेले. यानंतर शिंदे एका आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीकडे रवाना होणार आहेत. Eknath Shinde |
हेही वाचा :
Supriya Sule : पुण्यात उच्च न्यायालय खंडपीठाची गरज; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी





