“तुम्हाला कसं कळलं चीनने जमीन बळकावली? ” ; राहुल गांधींवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

Supreme Court on Rahul Gandhi। ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्धच्या मानहानीला आव्हान देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. आज सर्वोच्च नायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर कडक टिपण्णी केली. न्यायालयाने थेट सवाल करत,”तुम्हाला कसे कळले की चीनने भारताची २००० किलोमीटर जमीन बळकावली आहे? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असे बोलला नसता.” असे म्हणत त्यांच्यावर टिप्पणी केली.
तुम्ही असे का बोलला असता? Supreme Court on Rahul Gandhi।
२०२३ च्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल यांनी दावा केला की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याने त्यांना सांगितले होते की चीनने २००० चौरस किलोमीटर भारतीय भूभागावर कब्जा केला आहे. त्यांच्या विधानावरून राजकीय गोंधळ उडाला आणि त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला.
राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विचारले, ‘तुम्हाला कसे कळले की चीनने २००० किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला आहे?’ आणि यावर जोर देत ते म्हणाले, ‘जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही हे बोलणार नाही.’ न्यायालयाने विचारले, तुमच्याकडे काही विश्वसनीय माहिती आहे का? सीमेपलीकडे वाद असताना तुम्ही हे सर्व सांगू शकता का? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारू शकत नाही?असे म्हणत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
तसेच सुनावणी दरम्यान, न्यायालयाने राहुल गांधींना फटकारत, “जर तुम्ही विरोधी पक्षनेते असाल तर तुम्ही हे प्रश्न का बोलणार? तुम्ही संसदेत हे प्रश्न का विचारत नाही? यावर उत्तर देताना, राहुल यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की त्यांनी संसदेत बोलण्याचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निवडणूक लढवली नाही. कलम १९ (१) (अ) राहुल गांधींना प्रश्न विचारण्याची परवानगी देते.” असे म्हटले.
तसेच पुढे सिंघवी यांनी राहुल यांच्या वतीने,”त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणात दखल घेण्यापूर्वी त्यांना कोणताही नैसर्गिक न्याय देण्यात आलेला नाही.” असेही त्यांनी म्हटले. त्यासोबतच सिंघवी यांनी,”या खंडपीठाने कोणत्या भावनेने प्रश्न विचारले आहेत हे त्यांना समजते. परंतु येथे कोणताही नैसर्गिक न्याय किंवा सुनावणी झाली नाही यावर एकमत आहे.” असे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाची कार्यवाही स्थगित Supreme Court on Rahul Gandhi।
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की तुम्ही हा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित केला नाही, तुम्ही वेगळ्या मार्गाने गेला आहात. यावर सिंघवी म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाला सांगितले की ते कलंकित व्यक्ती नाहीत किंवा पीडितही नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, येथेही तुम्ही तुमच्या एसएलपीमध्ये कोणताही युक्तिवाद घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, पुढील कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे.





