Ghazal composer Bhimram Panchale : भीमराव पांचांळेंनी गझलेतून भावनांना मोकळी केली वाट; उपस्थितांनी उभं राहून दिली साथ, म्हणाले “सुरेश भट असते तर…”

Ghazal composer Bhimram Panchale : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्यानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ हा पुरस्कार प्रसिद्ध गझलकार भीमराम पांचाळे याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यंदाचे महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने या पुरस्कार सोहळ्याला खूप महत्व होते. गझलकार भीमराम पांचाळे यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना गझलेतून व्यक्त केल्या. यावेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पांचाळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र शासनाने केलेल्या गौरवाचे आभार मानले. यावेळी त्यांनी सुरेश भट असते तर त्यांना किती आनंद झाला असता असे म्हणत त्यांची आठवण या प्रसंगी काढली. मी आज भरून पावलो आहे, कारवा आहे गझलचा जायचे आहे, पुढे हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे, अशी शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यानंतर उपस्थितीतांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. या ध्यासाचा विराम ५३ वर्षांच्या वाटचालीचा एक छान विराम. सुरेश भट्टांच्या मुहूर्तवेढ देण्याच्या प्रयत्नांना हा छान विराम. सुरेश भट्ट असते तर किती खुश झाले असते, असे देखील ते म्हणाले.
फडणवीसांकडून कौतुक
मराठीतील गझलांमध्ये भीमराव पांचाळे आणि सुरेश भट यांचा कोई मुकाबला नही.. कित्येक देशांमध्ये त्यांनी गझला नेल्या. वर्ध्याच्या स्मशानातही त्यांनी कार्यक्रम केला. त्यांचा आपण गौरव करु शकलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव पांचाळे यांचं कौतुक केलं.
गझलकार भीमराव पांचाळे यांच्याविषयी….
कुणाला कोणता पुरस्कार मिळाला?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – भीमराव पांचाळे
चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार (2024) – प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर
चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री मुक्ता बर्वे
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (2024) – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री काजोल





