“उद्धव ठाकरेंची ऐकण्याची मानसिकता नव्हती…’; नेमकं गुलाबराव पाटील असं का? म्हणाले, वाचा…

मुंबई – कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे ‘गुलाबराव पाटील’ हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. गुलाबराव पाटील राज्यात जेव्हा पासून बंड झाले आहे तेव्हापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. आक्रमकपणा आणि धडाकेबाज वक्तव्य यांच्यामुळे त्यांची एक स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अश्यातच आता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्या प्रमाणे काही वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे-पहाटे शपथ घेतला आणि त्यानंतर अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त केली. तर दुसरीकडे दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते.. त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांची मनधरणी करून आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते.
मात्र, शिवसेनेत हे शक्य नाही. या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नच केला न्हवता… त्यांनी चूक सुधारली नाही. त्यांना ग ची बाधा नडली..” असा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता लगावला आहे.





