Political News : मोठी बातमी..! काँग्रेसच्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात खळबळ
Political News : काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

Political News : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मोठे राजकीय नाट्य घडले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे दोन आमदार नाराज झाले असून त्यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Political News)
राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये विजयपूरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौडा व्ही. पाटील आणि सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्णा यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (Political News)
Congress Leader : भीषण अपघातात काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ
दरम्यान, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात 20 नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असून नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच ए. व्ही. गायत्री शांतिगौडा यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. (Political News)
मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करूनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत काही आमदारांनी बोलून दाखवली. या असंतोषातूनच दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससमोर अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Political News)
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षातील असंतोष आणखी वाढणार की नेतृत्व नाराज आमदारांची समजूत काढणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Political News)
Political News : दुःखद बातमी..! एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ






