Maharashtra Voter List : महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना नाव नोंदणीची आणखी एक संधी!
Maharashtra Voter List : मतदार यादीतील त्रुटी आणि दुबार नावांवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे.

Maharashtra Voter List : विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार म्हणून चिन्हांकित झालेल्या किंवा ज्यांचे प्रगणक अर्ज वितरीत होऊनही वेळेत परत मिळाले नाहीत, अशा मतदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. (Maharashtra Voter List)
प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या या मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. हा नवा आदेश दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड या सात राज्यांमधील मतदारांसाठी लागू असणार आहे. (Maharashtra Voter List)
निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एका विशेष देखरेख यंत्रणेची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या यंत्रणेमुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीतून सुटणार नाही, याची काळजी घेतली जाईल; तसेच दुबार नाव नोंदणी रोखण्यासही मदत होईल. (Maharashtra Voter List)
ECI Voter List : पाच राज्यांतील मतदार संख्येत १३.२४ टक्क्यांची घट; निवडणूक आयोगाची माहिती





