Political News : दुःखद बातमी..! एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ
Political News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे.

Political News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या राजकारणातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी संघटन मंत्री जयप्रकाश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हिरा सिंह बिष्ट यांनीही अखेरचा श्वास घेतला. या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर शोककळा पसरली आहे. (Political News)
जयप्रकाश चतुर्वेदी यांच्या निधनाची माहिती मिळताच लखनऊ येथील भाजप मुख्यालयात नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी पक्षाच्या कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी राज्याचे संघटन सरचिटणीस धरमपाल, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, राज्य उपाध्यक्ष नीरज सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पक्ष कार्यालयात त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौनही पाळण्यात आले. (Political News)
दरम्यान, उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिरा सिंह बिष्ट यांचे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते तीन वेळा आमदार राहिले होते तसेच काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. उत्तराखंडच्या राजकारणात सर्वसामान्यांचे प्रश्न ठामपणे मांडणारे आणि जनतेशी कायम जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. (Political News)

हिरा सिंह बिष्ट यांच्या निधनाची बातमी समोर येताच काँग्रेसमध्ये शोककळा पसरली. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाची आठवण केली. (Political News)
एकाच दिवशी भाजप आणि काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राष्ट्रीय राजकारणात हळहळ व्यक्त केली जात असून, दोन्ही नेत्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Political News)
Political News : मोठी बातमी..! माजी मुख्यमंत्र्यांचा राजकारणातून तडकाफडकी सन्यास, राजकारणात खळबळ
Political News : ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा





