Political News : भाजपला सर्वात मोठा धक्का; ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला; प्रशांत किशोर निर्णायक आघाडीवर
Political News : बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर होताना दिसत आहे.

Political News : बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर होताना दिसत आहे. तब्बल तीन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दमदार मुसंडी मारत निर्णायक आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना मागे टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. (Political News)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर बांकीपूरची जागा रिक्त झाली होती. मागील सहा विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. मात्र, यावेळी निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरून भाजपच्या बालेकिल्ल्यालाच आव्हान दिले. (Political News)
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १६व्या फेरीअखेर प्रशांत किशोर यांना ३१,७४२ मते मिळाली असून ते ८,९६६ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांना २२,७७६ मते, तर राजदच्या रेखा कुमारी यांना ७,५०० मते मिळाली आहेत. (Political News)
एकूण ३१ फेऱ्यांपैकी १६ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, अद्याप १५ फेऱ्यांचा निकाल बाकी आहे. सध्याची आघाडी कायम राहिल्यास भाजपचा तब्बल ३० वर्षांचा बालेकिल्ला गमावण्याची शक्यता असून, बिहारच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. (Political News)
Political News : भाजपच्या कार्यालयावर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला; राज्यात खळबळ






