Vijaymala Pawar : ‘खरचं आई म्हणून खूप दुःख’; नसरापूर प्रकरणातील तपास अधिकारी महिलेची भावूक प्रतिक्रिया
Vijaymala Pawar : या निकालानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला अधिकारी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली.

Vijaymala Pawar : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा निकाल काल पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या प्रकरणातीला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी आरोपीला दोषी ठरल्यानंतर (२९ जून) सोमवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला. या निकालानंतर सर्वच स्तरातून कौतुक होत असून चिमुकलीला न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या निकालानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला अधिकारी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. (Vijaymala Pawar)
१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे भीमराव कांबळे (वय ६५) या नराधमाने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा अत्यंत निर्घूणपणे खून केला. या घटनेने महाराष्ट्र हादरला. सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर तीन महिन्यांच्या आत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत निकाल दिला. या निकालावर बोलताना तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी सांगितलं की, (Vijaymala Pawar)
तपास करणाऱ्या संपूर्ण टीमने जोखमीने काम केलं. या प्रकरणी ५५ साक्षीदार तपासले गेले. ही प्रवृत्ती किती घाणेरडे आहे, या गोष्टींच मला खूप वाईट वाटलं. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी रात्री मला फोन आला. तात्काळ ससून हॅास्पिटलला पोहचायचं आहे, असं सांगण्यात आलं होतं. एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला आहे, अशी माहिती देण्यात आली होती. तुम्ही या गुन्ह्याचा तपास करायचा असं सांगण्यात आलं. त्यानंतर तपासाला सुरूवात झाली. खरचं आई म्हणून खूप दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Vijaymala Pawar)
‘त्या’ कॅमेऱ्यामुळे आरोपी गजाआड (Vijaymala Pawar)
या प्रकरणात पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला. यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेण्यात आला. विजयमाला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचण येत होती. एका किराणा मालाच्या दुकानाच्या येथील एका कॅमेऱ्यात आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसला आणि तिथूनच तपासाला खरी दिशा मिळाला. त्या दुकानावरती कॅमेरा जर नसता तर आम्हाला कळालचं नसतं की त्या मुलीला कोण घेऊन गेलं, असं विजयमाला पवार म्हणाल्या.
हेही वाचा : Ahmed Khan : “सबका साथ, सबका विकास… माझ्या बाबतीतही तेच झालं;” प्रसिद्ध दिग्दर्शक असं का म्हणाला?





