Rohit Pawar : महाराष्ट्रातील भाजपच्या दिग्गज नेत्याला केंद्रात अर्थखातं? रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ
Rohit Pawar : रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar : काही राज्यातील आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता आहे. तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.
सध्याच्या काही मंत्र्यांनाकडून त्यांचा पदभार काढून त्या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे यांच्या पक्षातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
“महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठ्या फायनान्स मिनिस्ट्रीचं पद दिल जाऊ शकतं,” असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Eknath Shinde: ठाकरेंनी टाकला डाव? शिंदेंच्या आमदाराची लाचखोरी उघड; थेट व्हिडिओच दाखवला…
नेमकं कायम म्हणाले रोहित पवार?
“महाराष्ट्रात असा एक नेता आहे त्याच्याकडे छोटं पद आहे. जो मंत्री आहे त्याला महाराष्ट्रात एक मोठं पद दिलं जाईल. तसेच जे सहा खासदार पलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेले त्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकतं.”
रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटातून शिंदेंच्या सेनेत दाखल झालेल्या सहापैकी कोणत्या खासदाराला मंत्रीपद मिळणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आगामी काळात केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता सातत्याने व्यक्त केली जात आहे.
रोहित पवारांचा दावा खरा ठरणार?
या सर्व घडामोडींवर अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार? तसेच रोहित पवारांनी केलेला दावा खरा ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.






