Ketan Agrawal death case : ती चांगली सवय सियाने हेरली अन्…; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Ketan Agrawal death case : आता सियाला केतनची हत्या करण्याचा प्लॅन कसा सुचला याची माहिती समोर आली आहे.

Ketan Agrawal death case : केतन अग्रवाल या तरुणाचा त्याच्यात होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या साथीने काटा काढला. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. १८ जून या दिवशी ही घटना घडली. केतनचा त्याचा अपघाती मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. सध्या या प्रकरणात दररोज नवनवीन तपशील समोर येत आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून आणखी धक्कादायक तपशील समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हत्येचा प्लॅन कसा सुचला?
आता सियाला केतनची हत्या करण्याचा प्लॅन कसा सुचला याची माहिती समोर आली आहे. गोयल आणि अग्रवाल कुटुंबाने सिया आणि केतनचा विवाह ठरवला होता. त्यानुसार अगोदर साखरपुडा आणि त्यानंतर विवाह असं नियोजन करण्यात आलं होतं. दोघांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. त्यानंतर काही महिन्यांवर विवाह सोहळा होणार होता. पण त्याअगोदरच सियाने प्रियकराच्या साथीने मिळून अपघाती मृत्यूचा बनाव करून केतनला लोहगडाच्या उंच कठड्यावरुन ढकलून देत त्याची हत्या केली. याचं कारण म्हणजे सियाला केतन आवडता नव्हता. तिचं चेतन चौधरी याच्यावर प्रेम होतं. केतन प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली.
…अन् बिंग फुटलं
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुडा झाल्यानंतर केतन खूश होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती. त्याने यापूर्वी अनेक किल्ल्यांवर जाऊन ट्रेकींग केलं होतं. ३१ मे २०२६ रोजी पहिल्यांदा केतन स्वत: सियाला घेऊन लोहगडावर ट्रेकींगसाठी गेला होता. त्याची हीच सवय सियाने हेरली आणि त्याच्या हत्येचा कट आखला. ही हत्या वाटू नये तर अपघात वाटावा यासाठी तिने मोठा बनाव केला. पण केतनच्या बहिनीने सियाला केतनच्या मृत्यूविषयी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं तिला देता न आल्याने तिचं बिंग फुटलं.
सियाचा केतनकडे हट्ट
३१ मे या दिवशी पहिल्यांदा केतन आणि सिया लोहगडावर गेले. तिथे किल्ल्याच्या उंच शिखरावर पोहचले. इथे तिला पहिल्यांदा केतनला ढकलून देण्याचा प्लॅन सुचला. यानंतर तिने तीन वेळा केतनला हट्ट करून लोहगडावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ४ जून आणि ६ जून या दिवशी सियाने केतनला लोहगडावर घेऊन जाण्याचा हट्ट केला होता. ६ जूनला प्री वेडींग शूटसाठी दोघेही बालीला जाणार होते. पण केतनचा पासपोर्ट सापडला नाही, त्यामुळे बाली ट्रिप कॅन्सल झाली.
विश्वासाने घात केला
यानंतर १४ जून रोजी पुन्हा सियाने लोहगडावर जाण्याचा हट्ट केला. यावेळी दोघं गडावर गेले. प्लॅननुसार सियाने केतनला गडावरून ढकलूनही दिलं. मात्र तिथे असलेल्या एका झुडुपात अडल्याने केतन वाचला. केतन खाली पडला नाही, हे लक्षात येताच सियाने ‘साप आहे, साप आहे’ म्हणत घाबरल्याचं सोंग केलं आणि त्याला मिठ्ठी मारली. केतनलाही ही गोष्ट खरी वाटली आणि त्याने याकडे फारसं लक्ष न देता सियावर विश्वास ठेवला आणि याच विश्वासने त्याचा घात केला.
चांगली सवय हत्येचं कारण ठरली
अखेर १८ जूनचा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सियाचा वाढदिवस होता. त्यामुळे आदल्या दिवशी तिने प्री बर्थडे सेलिब्रेशनंच नाटक करून त्याला पुन्हा गडावल नेलं. यावेळी केतन मात्र वाचू शकला नाही. सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी संगनमत करून केतनला दरीत ढकलून दिलं. ट्रेकींगला जाण्याची एक चांगली सवय त्याच्या हत्येचे कारण ठरली.
हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: समंथाची गुडन्यूज! प्रेग्नन्सीची घोषणा करत म्हणाली; आता घेणार मॅटरनिटी ब्रेक






