Ahmed Khan : “सबका साथ, सबका विकास… माझ्या बाबतीतही तेच झालं;” प्रसिद्ध दिग्दर्शक असं का म्हणाला?
Ahmed Khan : चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादबाबत दिग्दर्शक अहमद खान यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Ahmed Khan : बहुचर्चित ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाने बॅाक्स अॅाफिस दणाणून सोडले आहे. ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी अनेकांनी साशंकता व्यक्त करत या चित्रपटाला प्रतिसाद मिळेल की नाही असं म्हटलं होतं. पण प्रेक्षकांचा उस्फुर्ते प्रतिसाद मिळत असल्याचे बॅाक्स अॅाफिसच्या आकडेवारील सिद्ध झाले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच आपली यशस्वी घौडदोड कायम ठेवली असून येत्या काही दिवसांत चांगली कमाई हा चित्रपट करू शकेल असा अंदाज आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादबाबत दिग्दर्शक अहमद खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना एक महत्वाचे वक्तव्य केलं आहे. “प्रत्येकाचा पाठिंबा… प्रत्येकाचा विकास… माझ्या बाबतीत हेच घडले.” असं वक्तव्य अहमद खान यांनी केल्याने या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने आपल्या संपूर्ण टीमचे आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. मोठा स्टारकास्ट आणि भव्य मांडणी असूनही हा चित्रपट मर्यादित बजेटमध्ये साकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले अहमद खान?
एएनआयशी बोलताना अहमद खान म्हणाले, “अडीच वर्षांच्या मेहनतीचं चीज झालं आहे. प्रेक्षकजण चित्रपट पाहताना मनमुराद हसत आहेत, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे. थिएटरमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून समाधान वाटतं.” चित्रपटाच्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांनी कलाकार आणि तांत्रिक टीमला दिलं. ते हसून म्हणाले, “प्रत्येकाचा पाठिंबा… प्रत्येकाचा विकास… माझ्या बाबतीत हेच घडले. प्रत्येक कलाकार या प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.”
निर्माते फिरोज नाडियादवाला यांचं कौतुक करताना अहमद खान म्हणाले, “त्यांना केवळ निर्माता म्हणणं योग्य ठरणार नाही. चित्रपटाविषयी त्यांची असलेली प्रचंड आवड आणि समर्पण यामुळेच हा प्रकल्प शक्य झाला.”
अक्षय कुमारचं केलं कौतुक
अक्षय कुमारबद्दल बोलताना अहमद खान यांनी त्याला चित्रपटाचा “आधारस्तंभ” म्हणाले. “संध्याकाळच्या सात वाजताच्या शिफ्टलाही तो सर्वात आधी सेटवर पोहोचायचा. त्याचा उत्साह आणि शिस्त संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी होती. तो नसता, तर हा संपूर्ण प्रकल्प डळमळीत झाला असता,” असे अहमद खान यांनी सांगितले. तसेच सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर आणि परेश रावल यांनीही चित्रीकरणादरम्यान मोलाचा पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर ‘वेलकम टू द जंगल’ दमदार कामगिरी करत आहे. Sacnilkच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनानंतरच्या चौथ्या दिवसापर्यंत या चित्रपटाने ७२.२५ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल असे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Parth Pawar : दिल्लीत पार्थ पवारांचं राजकीय वजन वाढलं! मोदी सरकारने सोपवली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी






