पिंपरी, दि. 17 – नेहरुनगर येथे पीएमपीएमएल रस्त्यामध्येच बंद पडली. तांत्रिक बिघाड झाल्याने बस बंद पडली होती. त्याचा इतर वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. पीएमपीएम प्रशासनाकडून बस दुरूस्तीचे काम करण्यात येत होते. तोपर्यंत चौकात वाहतूकीचा खोळंबा झाला होता.
पीएमपीएमएलच्या बिघाडाची मालिका थांबता थांबेना झाली आहे. बस नादुरूस्त असल्याने बंद पडत आहेत. परिणामी प्रवाशांना इच्छित स्थळी पोचण्यासाठी उशीर होत आहे. प्रवाशांच्या संतापाला वाहक व चालकांना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी (दि. 16) नेहरुनगर येथे भररस्त्यातच दुपारी चारच्या दरम्यान बस बंद पडली होती.
भोसरीवरून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या मार्गावर ही बस बंद पडली होती. त्याच्या दुरूस्तीची कामे कर्मचाऱ्यांकडून सुरू होती.
या चौकात वाहतूकीची मोठी वर्दळ असते. परिसरात खाऊची दुकाने, हॉटेल असल्याने नागरिकांची देखील ये-जा होते. गर्दी मोठी असल्याने बसमुळे वाहतूकीस मोठा निर्माण झाला होता. वाहतूकीचा खोळंबा झाल्याने वाहनचालक देखील संताप व्यक्त करत होते. तर प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या बसचा आधार घ्यावा लागला.