Sharad Pawar : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पंतप्रधान मोदींनी फोनवर संवाद साधत दिला महत्त्वाचा सल्ला
Sharad Pawar : मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे रवाना

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
शरद पवार यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते रुग्णालयाच्या बाहेर व्हिलचेअरवरून आले. बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हात उंचावले. त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर कारमध्ये बसले आणि मुंबईच्या दिशेने निघाले.
बारामतीच्या घरी न जाता थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे असणार आहेत. रुग्णालयातून निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व स्टाफचे हातजोडून आभार मानले.
दुष्काळ दौरा तातडीने केला होता रद्द (Sharad Pawar)
या ठिकाणी पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस आराम करणार आहेत. दिवाळीनंतर पवार पुन्हा एकदा दुष्काळाची पाहणी करणार असल्याचं सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि तीव्र खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ दौरा तातडीने रद्द करण्यात आला होता. तसेच त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी आज माध्यमांना याबाबतची माहिती दिली. या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी पवारांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
‘आम्ही सर्व मिळून देश सांभाळू’ (Sharad Pawar)

Sharad Pawar : शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पंतप्रधान मोदींनी फोनवर संवाद साधत दिला महत्त्वाचा सल्ला
“आपण आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या, कशाचीही चिंता करू नका. सुप्रिया सुळे आता उत्तम प्रकारे तयार आहेत, आम्ही सर्व मिळून देश सांभाळू,” असा सल्ला मोदींनी पवारांना दिल्याचं मणियार यांनी सांगितलं. आपुलकीने विचारपूसबद्दल शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानले.
हेही वाचा:
Tabu : वयाच्या १४ व्या वर्षी केली अभिनयाला सुरुवात; फ्लॉप डेब्यूनंतर ‘विजयपथ’ ठरला टर्निंग पॉइंट!





