Raj Thackeray video : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय! यंदाचा दीपोत्सव रद्द; राज ठाकरेंनी व्हिडिओ केला शेअर म्हणाले…
Raj Thackeray video : दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात दिपावली साजरी केली जाते. यासाठी जय्यत तयारी केली जाते. मात्र, दिपावली साजरी न करण्याची मोठी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

Raj Thackeray video : येत्या काही दिवसांवर दिपावली हा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा चिंतातुर आहे. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली आहे. (Raj Thackeray video)
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राजातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात दिपावली साजरी केली जाते. यासाठी जय्यत तयारी केली जाते. मात्र, दिपावली साजरी न करण्याची मोठी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.
एक्सवरुन व्हिडिओ शेअर त्यांनी शिवाजी पार्क मैदानात साजरा होणारा दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते म्हणतात प्रचंड उत्साह असतो. इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये रोषणाई केलेली असते, फटाक्यांची आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या आहेतच, मुंबई, ठाणे, इतर सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोकं तो दीपोत्सव पाहण्यासाठी म्हणून आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटतात.सगळेजण खूप इथे मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव हा साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला, आलेला आणि येऊ घातलेला हा जो भयानक दुष्काळ आहे, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला काही पटलं नाही.
नम्र आवाहन. https://t.co/KDkGAVF0ZC
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2026
राज ठाकरेंनी व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की १९७२ पेक्षाही जास्त भयानक हा मोठा दुष्काळ असेल आणि हे त्यांनी अगोदर जाहीर करून देखील मला असं वाटतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना बहुदा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे दिवाळी हा सण साजरा करत असताना, अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करत असताना मनाला ते काही पटत नाही आणि म्हणून या वर्षी हा निर्णय घेतला की हा दीपोत्सव साजरा करायचा नाही. (Raj Thackeray)
व्हिडिओतून राज ठाकरेंनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. या दिवाळीला आपण सर्वांनीच, अर्थात कंदील लावावेत, फराळ वाटावा, सगळ्या गोष्टी कराव्यात, परंतु रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घालावा एवढीच फक्त मला आपल्याला विनंती करायची आहे. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Raj Thackeray)





