Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक; तटकरेनंतर आता पटेलांनीही घेतली ‘साहेबांची’ भेट?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक पार पडली आहे.

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आजारपणातून सावरल्यानंतर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून विविध नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, एका नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. मात्र, बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या बैठकीनंतर राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या भेटीसाठी विरोधी गटातील नेत्यांचीदेखील ये-जा वाढल्याने राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. (Maharashtra Politics)
तटकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक; तटकरेनंतर आता पटेलांनीही घेतली ‘साहेबांची’ भेट?
दरम्यान, 12 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. “साहेबांच्या तब्येतीची माहिती मिळाल्यानंतर वेळ मागून भेट घेतली,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. (Maharashtra Politics)
तटकरे यांच्या भेटीनंतर आता प्रफुल पटेल यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नसल्याच्या चर्चेदरम्यान ही भेट झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी जोर आला आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा
प्रफुल पटेल बदमाश माणूस… गोंदिया रस्तेविहीन आणि मच्छरांनी त्रस्त; नाना पटोलेांचा जोरदार प्रहार
NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफकडी राजीनामा





