Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Sharad Pawar)
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यापासून सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली ही पहिलीच भेट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar)
साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो : सुनील तटकरे
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार साहेबांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी वेळ मागितली होती. आज वेळ मिळाल्याने भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. (Sharad Pawar)
तटकरेंनी भेट केवळ वैयक्तिक असल्याचा दावा केला असला तरी भेटीची वेळ आणि सध्याच्या राजकीय घडामोडी यामुळे या भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीतील नावांवरून चर्चांना उधाण
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. तटकरे हे राष्ट्रीय महासचिव तर प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. मात्र अधिकृत पत्रात त्याचा उल्लेख नसल्याने दोघांच्या पक्षातील भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. (Sharad Pawar)
आसाम दौऱ्यानंतर आता पवार भेट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकत्र आसाम दौरा केला होता. राष्ट्रवादीमध्ये कोणताही अंतर्गत वाद नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जात असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनील तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar)




