Maharashtra Politics : मोठी घडामोड..! ‘देवेंद्र फडणवीस केंद्रात, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री?’ बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आणि एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Maharashtra Politics)
एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी, “देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशा चर्चा ऐकल्या आहेत,” असे म्हटले. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की, ही अधिकृत माहिती नसून केवळ ऐकलेल्या चर्चा आणि राजकीय गॉसिप आहेत. (Maharashtra Politics)
चव्हाण यांनी राज्यातील पक्षांतरांच्या राजकारणावरही टीका करत, आमदार-खासदारांच्या फोडाफोडीमागे वैचारिक भूमिका नसून इतर कारणे असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील घडामोडी केंद्रातील नेतृत्वाच्या माहितीशिवाय घडू शकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशा बातम्याही समोर आल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, त्याबाबतही कोणतीही खात्रीलायक माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. त्यांनी माध्यमांना साधलेल्या संवादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला आहे. मात्र,त्यांनी यावेळी हे सर्व खासदार पक्ष सोडतील का नाही ते सांगता येणार नसल्याचंही म्हटलं आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ






