Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई; 50-60 लाखांची पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात अवैध आणि भेसळयुक्त उत्पादनांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने नांदेडमध्ये मोठी कारवाई करत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. FDA आणि नांदेड पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या धाडीनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (Tukaram Mundhe)
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मन्यार गल्ली परिसरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा असल्याची माहिती FDA आणि पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता, 37 प्रकारची सौंदर्यप्रसाधने आढळून आली. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या मालाची किंमत 50 ते 60 लाख रुपये आहे. (Tukaram Mundhe)
या कारवाईदरम्यान गोदाम मालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. हा माल नांदेडमध्ये कसा पोहोचला, त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, तसेच या उत्पादनांची विक्री कुठे केली जात होती, याचा तपास पोलीस आणि FDA करत आहेत. (Tukaram Mundhe)
घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन पाहणी केली. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. (Tukaram Mundhe)
दरम्यान, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त आणि संशयास्पद उत्पादनांविरोधात धडक कारवायांचे सत्र सुरू असून, नांदेडमधील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. (Tukaram Mundhe)






