Maharashtra Politics : मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणीची घटना ताजी असतानाच, आता रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra Politics : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेत घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक सूरज बामणे आणि अन्य दोघांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भाजप नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, या घटनेचा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी निषेध करत, “मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे केले त्याचे परिणाम भोगावे लागतील,” अशी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Politics)
या घटनेनंतर महाड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करावी आणि संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Maharashtra Politics)
सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Maharashtra Politics)
BJP News : भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
BJP Leader : मोठी बातमी..! भाजप आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; कारचा चक्काचूर






