Bhaskar Jadhav : मिसींग लिंकचा मोठेपणा पहिल्याच पावसात मातीमोल – भास्कर जाधव
Bhaskar Jadhav : 'मिसिंग लिंक'चा मोठेपणा पहिल्याच पावसात निसर्गाने मातीमोल केला," असा घणाघाती आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.

Bhaskar Jadhav : जगातील अनेक देशांतील तज्ञांचे सहाय्य आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून निर्माण केलेल्या मिसींग लिंकचा मोठेपणा पहिल्याच पावसात निसर्गाने मातीमोल करत जगासमोर आणला असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना केला. (Bhaskar Jadhav)
राज्यात पाच व सहा जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदश्य पावसामुळे वाहतूक ठप्प, महामार्ग बंद, वाहने अडकून पडणे, घरांची पडझड, लोक बेघर होणे,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यक्षमतेचा बरं गंभीर प्रश्न यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नियम-101अनुसार चर्चेद्वारे विरोधी पक्षांनी केली. (Bhaskar Jadhav)
भास्कर जाधव यांनी मिसींग लिंकवर दरड कोसळल्याचा विषय उपस्थित केला. 240 कि.मी.ताशी वेगाने वादळ आले तरी अजिबात धक्का लागणार नाही अशा घोषणा झाल्या होत्या.त्याचे काय झाले. दरड कोसळली त्यावेळी ताशी सत्तर कि.मी.इतक्याच वेगाने वारे वाहात होते लोकांचे हाल झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Bhaskar Jadhav)
ते म्हणाले, 2021साली पूरामूळे महाड शहरात हाहाकार झाला.खेड, चिपळूणही पाण्याखाली होते.अशा स्थितीत लोकांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या जातात.त्यांनी जावे कोठे?या आपात्स्थितीत निवारा म्हणून त्या क्षेत्रातील प्रत्येक गावात एक इमारत असावी अशी मागणी त्यांनी केली. (Bhaskar Jadhav)
पूर स्थिती उद्भवू नये म्हणून पाणी खाडीत सोडण्यासाठी दहा हजार कोटींची तरतूद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली होती.त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. (Bhaskar Jadhav)
परशुराम घाट कापू नका, वर असलेली आणि खाली असलेली गावे धोक्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या स्थितीविषयी भास्कर जाधव म्हणाले,आता पहिल्याच पावसाने दाखवून दिले, मुंबई ठाकरेंच्या हाती सुरक्षित होती. (Bhaskar Jadhav)





