Maharashtra Politics : मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंचे ‘हे’ 3 आमदार फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान आणखी एका भेटीची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान आणखी एका भेटीची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन आमदार आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी ही भेट विकासकामांच्या संदर्भात झाल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांचा समावेश होता. या नेत्यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प, प्रलंबित कामे आणि नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. (Maharashtra Politics)
माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी विधानभवनात मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि आगामी योजनांची माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांनी ही भेट घेतल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics)
यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणी, पाणी साचण्याच्या समस्या आणि त्यावरील तातडीच्या उपाययोजनांची मागणी या निवेदनातून करण्यात आली. (Maharashtra Politics)
दरम्यान, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी सध्या उपलब्ध माहितीनुसार ही भेट मुंबईतील विकासकामे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात कोणत्याही राजकीय निर्णयाची किंवा पक्षांतराची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Maharashtra Politics)






