पुणे – अनाथांच्या माई म्हणून संपूर्ण देशभरात परिचीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच आज पुण्यात निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर करत सिंधुताई यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.