Nashik Accident News : काळाची झडप! विहिरीत कार कोसळून भीषण अपघात; 9 जणांचा करूण अंत
Nashik Accident News : नाशिकच्या दिंडोरीमध्ये चारचाकी विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Nashik Accident News : काल 3 एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाशिकमधील दिंडोरीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेली चारचाकी थेट विहिरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या अपघाताच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरापर्यंत NDRf, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबविण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. यावेळी घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. चारचाकीत तीन ते चार लहान मुले असल्याची देखील माहिती आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार 3 एप्रिल 2026 रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली.
या दुर्देवी अपघाताच्या घटनेत 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आली. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते आहे. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाला.
मृतांची नावे
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण दगावले आहेत. सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे अशा एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा व इतर 4 नातेवाईक असे एकूण नऊ जण होते.
हेही वाचा : Uday Samant : “काम न करणाऱ्यांना डच्चू…” उदय सामंतांनी दिला ३० दिवसांचा अल्टिमेटम





