Donald Trump : ‘मध्यावधी निवडणुका होईपर्यंत इराणवर पुन्हा हल्ले नाहीत’; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची माहिती
मध्यावधी निवडणुका पूर्ण होईपर्यंत इराणवर हल्ल्यांचे आदेश आपण देणार नसल्याचे त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Donald Trump – अमेरिकेत ३ नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यावधी निवडणुका पूर्ण होईपर्यंत आपण इराणवरील हल्ले पुन्हा सुरू करण्याचे आदेश आपण देणार नाही, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन सदस्यांशी बोलताना ट्रम्प यांनी हे युद्ध निवडणुकीपूर्वी किंवा त्यानंतर लगेचच संपवले जाईल, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याचबरोबर इराणविधात पूर्ण ताकदीनिशी अंतिम लढा देण्याचा पर्याय आपण खुला ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
इराणविरुद्धचे युद्ध अवघ्या काही आठवड्यांसाठीच असेल, असे ट्रम्प आगोदर म्हणत होते. पण इराणविरोधातले अमेरिकेचे युद्ध गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे. आता निवडणुकीनंतर लगेचच हे युद्ध समाप्त करणे हाच एक व्यवहार्य पर्याय असल्याचे ते म्हणू लागले आहेत.
आता मध्यावधी निवडणुका पूर्ण होईपर्यंत इराणवर हल्ल्यांचे आदेश आपण देणार नसल्याचे त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणबरोबर अलिकडे झालेली चर्चा सकारात्मक होती.
जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांचा एक हंगामी युद्धबंदी करार झाला होता. या ६० दिवसांच्या कालावधीमध्ये वाटाघाटी पूर्ण होणे अपेक्षित होते. पण होर्मुझवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्यामुळे हा करार अपयशी झाला होता.
इराणने अलिकडेच दिलेला युद्धबंदीचा नवीन प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला आहे. नवीन प्रस्ताव इराणकडून दिला जाईल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.






