Arvind Kejriwal : आपचे नेतेही दिसणार जंतर-मंतरवर; अरविंद केजरीवाल कुटूंबीयांसमवेत आंदोलनात सहभागी होणार
स्वत: आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कुटूंबीयांसमवेत सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे सूतोवाच केले.

Arvind Kejriwal – सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय आपने घेतला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नेतेही दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलक म्हणून दिसू शकतील.
स्वत: आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कुटूंबीयांसमवेत सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे सूतोवाच केले. देशातील जनतेने अधिकाधिक संख्येने जंतर-मंतरवर जमावे. विषय एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून देशाचा आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भाजपवरही टीकेची झोड उठवली. भाजपला मतदान न करणाऱ्यांची नावे मतदारयाद्यांमधून वगळली जातात.
बनावट मतदार याद्यांमध्ये घुसवले जातात. ते कुमार यांच्या नजरेसमोर खुलेपणाने घडत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा संपूर्ण देश मागत आहे, अशी टिप्पणी केजरीवाल यांनी केली.





