History for Tim Southee : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला होता. या सामन्यादरम्यान अनेक मोठे विक्रम केले गेले, जिथे न्यूझीलंडच्या अनुभवी 35 वर्षीय टीम साऊदीने ऑकलंडच्या ईडन पार्क येथे पहिल्या T20I सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चार विकेट घेत इतिहास रचला. T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशी कामगिरी करणारा सौदी हा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. खरं तर, आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 150 बळी घेणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने T20 फॉरमॅटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज बनून टी-20 इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. हा विक्रम पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान केला गेला, जिथे साऊदीने 4 षटकात 25 धावा देत 4 बळी घेत आपले गोलंदाजी कौशल्य दाखवले.
उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी आणि हरिस रौफ या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना बाद करून न्यूझीलंडच्या 46 धावांनी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. टीम साऊदी, ज्याने फेब्रुवारी 2008 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता त्याने 118 सामन्यांत 22.96 च्या चांगल्या सरासरीने आणि 8.11 च्या इकॉनॉमी रेटने 151 बळी घेतले आहेत. साऊदीने आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 19 सामन्यात 32 विकेट आहेत.
History for Tim Southee 🙏
The first player ever to reach 150 T20 international wickets 👏 #NZvPAK #CricketNation pic.twitter.com/mhcAAniy8V
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 12, 2024
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी
1. टिम साऊदी (न्यूझीलंड) : 118 सामन्यात 151 विकेट्स
2. शाकिब अल हसन (बांगलादेश) : 117 सामन्यात 140 विकेट्स
3. राशिद खान (अफगाणिस्तान) : 82 सामन्यांत 130 विकेट्स
4. ईश सोधी (न्यूझीलंड) : 106 सामन्यात 127 विकेट्स
5. लसिथ मलिंगा (श्रीलंका) : 84 सामन्यात 107 विकेट्स
NZ vs PAK : कोरोनाचा क्रिकेट विश्वात पुन्हा शिरकाव, न्यूझीलंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला झाली लागण…
टीम साऊदीच्या या कामगिरीमुळे तो बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनच्या पुढे आहे, ज्याने आतापर्यंत T20 मध्ये 140 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू इश सोधी (127) आणि मिचेल सँटनर (105) सोबत 100 हून अधिक टी-20 विकेट्स घेऊन न्यूझीलंड क्रिकेट गोलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या साऊदी टी-20मध्ये दोनदा पाच बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव किवी गोलंदाज आहे. 2022 मध्ये युएई UAE विरुद्ध दुसऱ्यांदा पाच विकेट घेतल्यानंतर हा विक्रम झाला, 2010 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा पाच विकेट घेतल्या होत्या.