Retirement : अनुभवी वेगवान गोलंदाजाची कसोटीतून निवृत्तीची घोषणा, ‘या’ महत्वाच्या मालिकेनंतर Test क्रिकेटला करणार अलविदा…

Tim Southee will retire from Test cricket : न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साऊदीने त्याच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. आपण लवकरच टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचे साऊदीने जाहीर केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटच्या वेळी मैदानात उतरणार आहे. मात्र, त्याचा संघ डब्ल्यूटीसी (WTC) फायनलमध्ये पोहोचल्यास तो निवडीसाठी उपलब्ध असेल. अशाप्रकारे 15 डिसेंबरला तो हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथील त्याच्या घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
JUST IN: Tim Southee will retire from Test cricket at the end of New Zealand’s upcoming series against England, bowing out at his home ground of Seddon Park in Hamilton pic.twitter.com/PGLXy5np0W
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 14, 2024
टीम साऊदीने (Tim Southee) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 11 वेळा विराट कोहलीला तर 14 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात टीम साऊदीने टीम इंडियाच्या फलंदाजांना मेटाकुटीला आणलं होते. न्यूझीलंडने टीम इंडियाचा त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक 770 विकेट घेतल्या आहेत.
“Fulfilling a childhood dream”
From a farm in Northland to the world stage! Hear from Tim Southee about his decision to retire from Test cricket after the upcoming Test series against England. Read more | https://t.co/L6IuX3jCea #NZvENG pic.twitter.com/93tdLszJky
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 15, 2024
टीम साऊदी म्हणाला, “मी माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक, आमचे चाहते आणि खेळाशी संबंधित प्रत्येकाचा सदैव ऋणी राहीन, ज्यांनी मला आणि माझ्या कारकिर्दीला अनेक वर्षांपासून पाठिंबा दिला आहे. हा एक स्मंरणीय प्रवास राहिला आहे आणि मी त्यात काहीही बदल करू इच्छित नाही.”
टीम साऊदीने आतापर्यंत न्यूझीलंडकडून 104 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने खेळले असून 770 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. टीम साऊदीला 4 एकदिवसीय विश्वचषक, एकूण 7 टी-20 विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि 2019-21 सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.





