IND vs ENG : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा मास्टर स्ट्रोक! ‘या’ दिग्गज खेळाडूची खास पदावर केली नियुक्ती

IND vs ENG Tim Southee Appointed as England Bowling Consultant : भारतीय संघाचा इंग्लंड दौरा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडने तयारी सुरू केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम साउदीला संघात घेतले आहे. टिम साउदीला एक विशेष पद देण्यात आले आहे.
टिम साउदीची इंग्लंडच्या तज्ज्ञ कौशल्य सल्लागार म्हणून नियुक्ती –
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी टिम साउदीची इंग्लंडच्या तज्ज्ञ कौशल्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिथे तो त्याच्या अनुभवाच्या बळावर तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी देईल. तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारतीय संघ २० जूनपासून लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करेल. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीने हा दौरा संपेल.
Our new Specialist Skills Consultant 😍
We’re delighted to announce that Tim Southee, New Zealand’s all-time leading wicket-taker, is joining us on a short-term basis.
Read more 👇
— England Cricket (@englandcricket) May 15, 2025
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा मास्टर प्लॅन –
विशेष म्हणजे टिम साउदीचा कार्यकाळ फार काळ ठेवण्यात आलेला नाही. तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंतच या भूमिकेत दिसणार आहे. साऊदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप अनुभव आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी साऊथी इंग्लिश संघात सामील होईल. ब्रेंडन मॅक्युलम हे तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि साउदीसोबत आता ते इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी देतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक :
- पहिली कसोटी – २०-२४ जून २०२५ हेडिंग्ले, लीड्स
- दुसरी कसोटी – २-६ जुलै २०२५ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
- तिसरी कसोटी – १०-१४ जुलै २०२५ लॉर्ड्स, लंडन
- चौथी कसोटी – २३-२७ जुलै २०२५ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- पाचवी कसोटी – ३१ जुलै-४ ऑगस्ट २०२५ द ओव्हल, लंडन
हेही वाचा – IPL 2025 : बटलर आउट, मेंडिस इन: गुजरात टायटन्सचा प्लेऑफसाठी मास्टर प्लॅन, काय आहे कारण?
भारतीय संघाच्या अडचणी वाढणार –
इंग्लंडविरुद्धचा भारतीय संघ युवा खेळाडूंनी भरलेला असेल हे उल्लेखनीय आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि महान फलंदाज विराट कोहली यांनी निवृत्ती घेतली आहे. याशिवाय, रविचंद्रन अश्विन देखील आता कसोटी संघाचा भाग नाही. अशा परिस्थितीत इंग्लंडचा दौरा भारतीय क्रिकेट संघासाठी अग्निपरीक्षेपेक्षा कमी असणार नाही. या सगळ्यामध्ये, इंग्लंडच्या छावणीत टिम साउदीची उपस्थिती भारताच्या अडचणी निश्चितच वाढवेल.





