बारामती – शरयू फाउंडेशन तसेच बारामती रनर्स ग्रुपच्या वतीने बारामती शहरात हाफ मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.( 19) रोजी सकाळी सहा वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. केनियातील चार स्पर्धक या स्पर्धेत धावणार आहेत. दोन हजारहून अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
शहरातील भिगवण रस्त्यावरून कटफळ चौकापर्यंत हे मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहे. २१ किलोमीटर १० व ३ किलोमीटर मध्ये स्पर्धा होणार आहे. एम ई एस हायस्कूल येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. देशातील मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड हरियाणा पंजाब राज्यातील तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. तसेच केनिया देशातील चार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. शरयू फाउंडेशन आयोजित केलेल्या मॅरेथॉनला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मॅरेथॉनमुळे उद्या सकाळी वाहतुकीमध्ये बदल
सदरची मॅरेथॉन भिगवन रोड पेन्सिल चौक मार्गे एमआयडीसी रोडने कटफळ चौकापर्यंत आहे. त्यासाठी भिगवन रोडची एमआयडीसी कडे जाणारी व एमआयडीसीतून कटफळकडे जाणारी डावी बाजू फक्त धावपटूंसाठी असेल. उजव्या बाजूने ट्राफिक हे कोर्ट कॉर्नर रिंग रोडपर्यंत चालू असेल. तसेच रेल्वे उड्डाणपूल सातव चौकाकडून येणारी वाहतूक ही उड्डाणपूल उतरल्यानंतर रेल्वे रुळाकडेने एमआयडीसी कडे डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. सिनेमा रोड तीन हत्ती चौकाकडून येणारी वाहतूक ही खाऊ गल्ली जेष्ठ नागरिक संघ टीसी कॉलेज बाजूने वळवण्यात आलेली आहे. एमआयडीसीतील सर्व अवजड वाहने ही शक्यतो सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत बाहेर आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
मॅरेथॉन साठी येणाऱ्या धावपटूंनी आपली वाहने शारदा प्रांगण कॅनल कडेला खाऊ गल्ली, ज्येष्ठ नागरिक संघ, जैन मंदिराकडून रिंग रोड कडे देशपांडे हॉस्पिटल जाणाऱ्या रोडवर, अशोक नगर तसेच कॅनॉलच्या कडेने परकाळे पुलापर्यंत क्रीडा संकुल समोर पार्किंग करावे. सदरचा वाहतूक बदल फक्त सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत ज्यावेळेस वर्दळ नसते त्यावेळेस असेल.