जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये विचित्र गोष्टी दिसतात. अनेक लोकांमध्ये या गोष्टी देवाने दिलेल्या असतात. अशा अनेक अनोख्या गोष्टी सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात ज्याबद्दल लोकांना जाणून आश्चर्य वाटते. या विचित्र गोष्टींमुळे जागतिक विक्रम होतात. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक अशी व्यक्ती समोर आली आहे, ज्याचा विक्रम तीनशे वर्षांपासून कोणीही मोडला नाही.
ज्या व्यक्तीचा विक्रम तीनशे वर्षांपासून अनेकांनी मोडला नाही त्याचे नाव आहे, थॉमस वेदर्स ( Thomas Wedders) . जगातील सर्वात लांब नाक असलेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्यक्तीचे छायाचित्र पाहिल्यानंतर एखाद्याचे नाक इतके लांब असू शकते याची खात्री लोकांना पटली आहे. हिस्टोरिक विड्स नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, जो एका संग्रहालयात ठेवलेल्या मेणाच्या पुतळ्याचा आहे. हे चित्र 12 नोव्हेंबरला ट्विट करण्यात आले होते.
Thomas Wadhouse was an English circus performer who lived in the 18th century. He is most famously known for having the world’s longest nose, which measured 7.5 inches (19 cm) long. pic.twitter.com/Gx3cRsGXxd
— Historic Vids (@historyinmemes) November 12, 2022
हिस्टोरिक विड्सच्या वतीने ट्विटरवर सांगण्यात आले आहे की थॉमस वेदर्सचे नाक 7.5 इंच लांब होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटवर या व्यक्तीबद्दल एक पृष्ठ देखील आहे. जिथे त्यांची माहिती देण्यात आली आहे.
हिस्टोरिक वीड्सने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, थॉमस वेदर्स हे इंग्रजी सर्कस कलाकार होते. ते 18 व्या शतकात जन्मले आणि जगातील सर्वात लांब नाक असलेले म्हणून ओळखले जात. त्यांच्या नाकाची लांबी 7.5 इंच (19 सेमी) होती. या ट्विटला सुमारे 1.20 लाख लोकांनी लाईक केले आहे तर 7,300 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या वेबसाइटवर थॉमस वेदर्सचे वर्णन केले आहे की ते 1770 च्या दशकात इंग्लंडमध्ये राहत होते आणि सर्कसमध्ये काम करत होते. त्यांच्या नाकाची लांबी 7.5 इंच (19 सेमी) होती अशी नोंद आहे.
सावधान ! QR code स्कॅनमधील चूक तुमचे Bank Account रिकामी करू शकते, ते टाळण्याचे ‘हे’ आहेत मार्ग !
पण सर्वात लांब नाक असलेल्या जिवंत व्यक्तीचा विक्रम तुर्कीच्या मेहमेट ओझ्युरेकच्या नावावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याची पुष्टी केली होती. त्याचे नाक 3.46 इंच लांब आहे.