Arjun Tendulkar Engagement : तेंडुलकर कुटुंबात लगीनघाई! सचिन तेंडुलकर यांच्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा; होणाऱ्या सूनबाई सानिया चांडोक कोण?

Arjun Tendulkar Engagement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू अर्थात सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे. सचिन तेंडुलकर यांचा मोठा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने त्याची बालमैत्रीण सानिया चांडोक हिच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यामुळे आता मुंबईतील नामांकित उद्योपती रवी घई यांची नात तेंडुलकर घराण्याच्या सूनबाई होणार आहे. दोघांचा साखरपुडा झाल्याची बातमी इंडिया टूडेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुड्याचा कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडला. त्यामुळे आता अर्जुन आणि सानिया लवकरच विवाहबंधनात अडणार आहेत. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना सानिका चांडोक नेमकी कोण आहे, याची उत्सुकता लागली आहे. तर सानिया ही मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुन तेंडुलकर २५ वर्षांचा आहे.
कोण आहे सानिया चांडोक?
सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती अर्जुनची बालपणाची मैत्रिण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचे कुटुंब म्हणून ओळखले जाते. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आइस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत. सानिया चांडोक हि डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सनुसार अशी माहिती आहे.
अर्जुन तेंडुलकरविषयी…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी कूण पाच सामने खेळले आहेत. मात्र, अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
हेही वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा धडाका ! मुंबईसह कोकण, विदर्भाला हायअलर्ट; IMDचा मोठा इशारा





