गोव्यात व्हेकेशन टूर! कुटुंबासह अमोल पराशरसोबत दिसली कोंकणा सेन शर्मा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Konkona Sen Sharma : काही आठवड्यांपूर्वी कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पराशर हे त्यांच्या “ग्राम चिकित्सालय” या शोच्या स्क्रीनिंगमध्ये एकत्र दिसले तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चां सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत अद्यापर्यंत पुष्टी केली नाही. अशातच आता हे दोघे त्यांचे मित्र आणि कुटुंबासह गोव्यात व्हेकेशन टूरवर आले आहेत. गोव्यात व्हेकेशनचा आनंद लुटतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दोघांच्या एका कॅामन मित्राने त्याच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अमोल पराशर आणि त्याचे मित्र सर्वजण एकत्र उभे असल्याचे दिसत आहे आणि आणखी एक फोटो ज्यात कोंकणा आणि त्याच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणी दिसत आहे. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करताना एका रेडिट युजरने लिहिले, “कोंकणा आणि अमोल पराशर गोव्याच्या त्यांच्या पहिल्या कुटुंबाच्या सहलीचा आनंद घेत आहेत.”
या दोघांनाही एकत्र पाहून नेटकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. एका वापरकर्त्याने पोस्टवर कमेंट केली, “ते खूप गोंडस आहेत! गोव्यात त्यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली.” अमोल पराशर १७ सप्टेंबर २०२५ रोजी त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा अभिनेता त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात दाखल झाला आहे. दरम्यान, कोंकणा या वर्षी डिसेंबरमध्ये ४६ वर्षांची होणार आहे. या दोघांच्याही रेलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
हेही वाचा : “दोन राज्ये, दोन जागा, १२,००० मतांचा घोटाळा…” ; राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर टाकला नवा बॉम्ब





