Deepak Kate : अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मोटी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये दीपक काटे याचे नाव समोर आले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच आता ३ जानेवारी या दिवशी पुणे विमानतळावरील एका प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३ जानेवारील दीपक काटेला पुणे विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याच्या बँगमध्ये दोन पिस्तुलाची मॅगझिन आणि २८ काडतुसं सापडली होती. पोलिसांनी ४ जानेवारीला त्याला न्यायालयासमोर हजर केले. मात्र, त्यावेळी काटेवर याआधी कोणते गुन्ह्याची नोंद असल्याचे आढळलेले नाही असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, काटेवर 2021 सालचे दोन आणि 2023 सालचे तीन असे एकूण चार गुन्हे त्यावेळी दाखल होते आणि ते न्यायप्रविष्ठ होते, अशी माहिती मिळत आहे. काटेच्या बँगमध्ये सापडलेली पिस्तुलाची मॅगझिन आणि काडतुसे फॅारेन्सिक तपासणीसाठी पाठवण्याचे राहून गेल्याने चार्जशीट दाखल केली नसल्याचे पोलिस सांगत आहेत, पोलिसांच्या म्हणण्यानुसार आज ना उद्या ती पाठवली जातील. काटेला २०१० मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आठ वर्ष तुरंगवासाची शिक्षा झाली होती. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेकच्या प्रकरणामध्ये दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोण आहे दीपक काटे? दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी आहे. भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर त्याचे बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. पुणे विमानतळावर काय घडलं होतं? दीपक काटे पुण्याहून हैद्राबादला विमानाने जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. त्यावेळी सुरक्षा तपासणीमध्ये त्याच्या बॅगमध्ये एक पिस्तुकल आणि २८ काडतुसं आढळून आली होती. हेही वाचा : Suresh Dhas : पीक विमा घोटाळ्यात कोट्यवधींची लूट, विनय आवटे अन् धनंजय मुंडेंवर सुरेश धसांचा हल्ला