व्हर्जिनिया – जीवशास्त्रीय सृष्टीमध्ये गोम हा प्राणी त्याच्या अनेक पायांसाठी प्रसिद्ध आहे व्हर्जिनियामधील काही शास्त्रज्ञांना तब्बल 1306 पाय असलेल्या गोमेचा शोध लागला आहे तज्ञांनी या अनोख्या प्राण्याला युमिलीप परसेफोन असे नाव दिले आहे हा अनोखा प्राणी जमिनीवर खोलवर वास्तव्य करतो आणि क्वचितच जमिनीच्या वर येतो हा प्राणी काही कारणाने वर आला तेव्हाच संशोधकांना सापडला.
Using genome sequencing and phylogenomics, we showed that super-elongation in the millipede class Diplopoda (>180 segments) has repeatedly evolved—especially in those taxa that live in subterranean microhabitats pic.twitter.com/gvGZew34U0
— Millipede Lab (@apheloria) December 16, 2021
लाईव्ह सायन्स या नियतकालिकात याबाबत संशोधन प्रसिद्ध असून या अनोख्या गोमेचा शोध लावणाऱ्या कॉल मॅरिक या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यापूर्वी 750 पाय असणारी गोम आढळली होती.
जी आतापर्यंत सर्वात मोठी गोम मानण्यात येत होती आता तेराशे सहा पाय असणाऱ्या या गोमेला डोळे नाहीत या गोमेच्या डोक्यावर शंखाच्या आकाराची एक अँटिना आहे त्या एंटीनाच्या माध्यमातून ही गोम हालचाल करते असे अशा प्रकारचे हे जीव जास्त काळ जगू शकत नाहीत असेही या संशोधकांनी म्हटले आहे.
जमीनीखाली खोलवर राहणाऱ्या या गोमेसारख्या अनेक प्राण्यांवर आणखी संशोधन होण्याची अपेक्षा ही संशोधकांनी व्यक्त केली आहे