बेळगाव – कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे.
कोल्हापूरात लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याचे संदेश शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांकडून पाठविण्यात येत आहेत. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल या समाजकंटकांनी व्हायरल केला आहे.
दरम्यान, या घटनेबाबा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून सोशलवर पोस्ट लिहीत या घटनेचा निषेध केला आहे.’दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते..हे चित्र बेंगळुरू येथील आहे..धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!!’
संजय राऊत यांची पोस्ट