‘चला हवा येऊ द्या 2’मध्ये निलेश साबळेची जागा घेणार ‘हा’ अभिनेता

Nilesh Sable | ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यातच आता या कार्यक्रमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांची झलक पाहायला मिळाली होती.
परंतु, समोर आलेल्या वृत्तानुसार, नव्या सीझनमध्ये निलेश साबळेची जागा अभिनेता अभिजीत खांडकेकर घेणार आहे. अभिजीत या सीझनच सूत्रसंचालन करणार आहे. तर याचे दिग्दर्शन अभिनेता प्रियदर्शन जाधव अभिनेता योगेश शिरसाट आणि अमोल पाटील करणार आहे.
आजवर अभिजीतने कथाबाह्य कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. त्याच्या निवेदनाचा वेगळा चाहतावर्ग आहे. आता तो एका गाजलेल्या विनोदी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनचा सूत्रधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. या भूमिकेत त्याला पाहण्यासाठी चाहत्यांचीहीउत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, लेखकांच्या टीममध्ये प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट यांच्यासह अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पुर्णानंद वांडेकर, अनिश गोरेगांवकर हे सुद्धा असणार आहेत. तर श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे यांच्यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे या नव्या नावाची भर पडली आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत. Nilesh Sable |
मात्र निलेश आणि भाऊ कदम नवीन सीझनच्या टिझरमध्ये दिसले नसल्याने त्याविषयीही चर्चा झाली होती. पण आता या पर्वात आणखीही काही लोकप्रिय कलाकार दिसणार असल्याचे समोर आले आहे. Nilesh Sable |
हेही वाचा :





