‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळेची स्टार प्रवाहवरील शोमध्ये धमाकेदार एन्ट्री

Nilesh Sable | ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे चर्चेत आलेला निलेश साबळे आता लवकरच नवी सुरुवात करणार आहे. स्टार प्रवाह वर त्याने दमदार एन्ट्री घेतल्याने चाहत्यानी देखील आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या धमाकेदार कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
या ‘ग्रँड फिनाले’मध्ये सेलिब्रिटी जोड्यांची धम्माल तर असणारच आहे, पण यासोबतच खास आकर्षण ठरणार आहे, महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर आणि ‘चला हवा येऊ द्या’ फेम डॉ. निलेश साबळे याची एन्ट्री होणार आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात अमेय वाघच्या जोडीला निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव आले आहेत. ज्याचा प्रोमो देखील समोर आला आहे.
शिट्टी वाजली रे च्या मंचावरच्या या अनुभवाविषयी सांगताना निलेश साबळे म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी पाहत आलोय. आता होऊ दे धिंगाणा आणि शिट्टी वाजली रे हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. स्टार प्रवाहने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. शिट्टी वाजली रे च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गंमतीदार ठरला. मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती. त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो.’ Nilesh Sable |
‘शिट्टी वाजली रे’ या अंतिम सोहळ्यात ‘नमस्कार, सुस्वागतम मी डॉ निलेश साबळे..सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या लोकप्रिय खाद्य महोत्सवात ज्याचं नाव आहे शिट्टी वाजली रे ‘म्हणत निलेश साबळेने एन्ट्री घेतली आहे. Nilesh Sable |
‘चला हवा येऊ द्या’चं नवं पर्व
‘चला हवा येऊ द्या’चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यामध्ये निलेश साबळे सूत्रसंचालन करताना दिसणार नाही. त्याजागी अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. निलेश साबळेला झी मराठीने डच्चू दिला अशीही चर्चा झाली. यादरम्यान राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या चर्चेला नवे वळण प्राप्त झाले होते. त्यांनी निलेश साबळेंच्या डोक्यात ‘हवा गेली’ आणि सेटवर त्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला. मात्र निलेशने त्याचं खंडन केलं आणि सिनेमात व्यस्त असल्याने कार्यक्रमाला वेळ देता येणार नसल्याचा खुलासा केला. Nilesh Sable |
हेही वाचा :





