Nilesh Sable: नवा दिवस… नवा विचार… चला…; निलेश साबळे नव्या प्रोजेक्टमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी लोकप्रियता मिळाली. या शोच्या माध्यमातून निलेश साबळेला घराघरात लोकप्रियता मिळाली. झी मराठीवर या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.

Nilesh Sable: ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी लोकप्रियता मिळाली. या शोच्या माध्यमातून निलेश साबळेला घराघरात लोकप्रियता मिळाली. झी मराठीवर या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.
मात्र त्यात संपूर्ण टीम पाहायला न मिळाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मधल्या काळात निलेश साबळेनं भाऊ कदमसोबत एक शो सुरु केलेला, मात्र तो शोही बंद पडला. त्यानंतर आता निलेश साबळेने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. निलेश साबळेनं (Nilesh Sable) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सूट घालून खुर्चीवर बसला आहे. डोळ्यावर चष्मा आहे. काहीसा गंभीर आणि जबाबदार वाटणारा निलेश साबळेचा लूक आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करत निलेश साबळेनं कॅप्शन लिहिलंय की, “नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!” दरम्यान, निलेश साबळे आता नवं काय करणार, याची उत्सुकचा सर्वांना लागली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Nilesh Sable:
अनेकजण नव्या कार्यक्रमासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. निलेश आणि भाऊ कदम यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते. त्यामुळे आता निलेश साबळे (Nilesh Sable) कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Nilesh Sable:
हेही वाचा:





