निलेश साबळेचा ‘हसताय ना हसायला पाहिजे’शोने अवघ्या तीन महिन्यातच घेतला प्रेक्षकांचा निरोप

Hastay Na Hasaylach Pahije Show Off Air| ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून डॉ. निलेश साबळे घराघरात पोहचला. या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर निलेशचा कलर्स मराठीवर ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा शो प्रेक्षकांचा भेटीस आला. मात्र अवघ्या तीन महिन्यानंतर आता या शोने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
या कॉमेडी शोमध्ये निलेशसह भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे देखील झळकले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अचानकपणे हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने चर्चांना उधाण आले. कलर्स मराठी वाहिनीवर आता ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘बिग बॉस मराठी सीझन-5’ रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 जुलै रोजी या रिएलिटी शोचा प्रीमियर पार पडणार आहे. त्यामुळे निलेशचा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीसाठी काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. यात ‘हसताय ना हसायला पाहिजे’ या कॉमेडी शोचा देखील समावेश आहे. मात्र याचा दुसरा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:
केंद्रीय कर्मचारी आता RSS च्या कार्यक्रमांत सहभागी होऊ शकणार ; तब्बल ५८ वर्षांनंतर उवठली बंदी





