निलेश साबळे आणि भाऊ कदमचे दणक्यात पुनरागमन; पुन्हा झी मराठीवर झळकणार

Nilesh Sable-Bhau Kadam | झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ह्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळाली. डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वामध्ये सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकरने केलं.
मात्र आता निलेश साबळेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निलेश साबळे पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भाऊ कदमचे देखील त्याच्यासोबत झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे.
झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम पाठमोरे उभे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट असून भाऊ आणि निलेश स्टायलिश अंदाजात पाहायला मिळत आहेत. Nilesh Sable-Bhau Kadam |
दोघे पाठमोरे असले आणि त्यांचा चेहरा दिसत नसला तरीही चाहत्यांनी निलेश आणि भाऊला ओळखलं आहे. निलेश आणि भाऊ ‘चला हवा येऊ द्या’ नव्हे तर वेगळ्याच शोमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे. Nilesh Sable-Bhau Kadam |
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बाकीच्यांचं COMEBACK होणार असेल 2026 वर्षात, आपलं COMEBACK 2025 मध्येच होणार! ‘उगाच’ नाही….बघाच लवकरच…” गेल्या अनेक दिवसांपासून झी मराठीवर या शोचं प्रमोशन सुरु आहे. त्यामुळे सर्वांना या शोची उत्सुकता आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ च्या नव्या पर्वात निलेश साबळे नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र निलेश साबळेनं इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो आणि भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार नसल्याचं सांगितलं. मात्र आता सर्वांचे दोन लाडके कलाकार कमबॅक करण्यास सज्ज झाले आहेत. Nilesh Sable-Bhau Kadam |
हेही वाचा:
महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता; आयोगाची आज पत्रकार परिषद





