नवी दिल्ली – जागतिक परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे काही गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे वळू लागले असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याचा दर 173 रुपयानी वाढून 55, 074 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दरही 926 रुपयांनी वाढून 70,205 रुपये प्रति किलो झाला.
दरम्यानच्या काळात डॉलर घसरत असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वळत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस या संस्थेचे विश्लेषक नवनीत दमानी यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,807 डॉलर व चांदीचा दर 24.19 डॉलर प्रति औंस पातळीवर होता.