प्राणी कोणताही असो, प्रत्येकाला जगायचे असते. प्राण्यांना कोण घाबरत नाही? पण आज आम्ही तुम्हाला एक अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत ज्याचे विष तुमच्यासाठी मौल्यवान ठरू शकते. हा प्राणी एक विषारी विंचू असून हा फक्त जंगली भागातच आढळतो.
तो इतका विषारी आहे की त्याच्या चाव्याव्दारे माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. परंतु त्याचे विष लोकांसाठी खूप मौल्यवान आहे, कारण त्याच्या विषाने तुम्ही चक्क श्रीमंत होऊ शकता.
या विषाची किंमत हजारो-लाखांमध्येच नाही तर कोटींमध्ये सांगितली जाते. आता विष कोण विकत घेणार याचा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या विषाचा वापर महागडी आणि प्रभावी औषधे बनवण्यासाठी केला जातो.
अशी अनेक संयुगे या विषामध्ये आहेत जी वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. त्यात सापडलेल्या 5 दशलक्षाहून अधिक संयुगांपैकी अनेकांचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हा एक निळा विंचू असून त्याच्या एक लिटर विषाची किंमत तब्बल 75 कोटी 86 लाख 22 रुपये आहे.
या विषापासून ‘स्कॉर्पियन पॉयझन’ नावाचे औषध तयार केले जाते, ज्याचा वापर कर्करोगासारख्या आजारांना मुळापासून दूर करण्यासाठी केला जातो. याला चमत्कारिक औषध असेही म्हणतात. या विंचूचे विष थायलंडच्या जगप्रसिद्ध किंग कोब्राच्या विषापेक्षा महाग आहे.