चिंबळी- करोनाच्या धास्तीने घरपोच सिलिंडर पुरवठा सेवा चिंबळी (ता. खेड) परिसरात पूर्णपणे कोलमडली आहे. सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांनी आगाऊ सिलिंडर बुकिंग करून गर्दीत आणखी भर पाडली आहे. त्यामुळे, पुरवठादारही हतबल झाले आहेत. त्यामुळे घरपोच सिलिंडर सेवा न देता एका चौकात सिलिंडर गाडी उभी केली जात असल्याने नागरिक चौकात धाव घेत आहेत. काहीजण सिलिंडर दुचाकीवर नेत आहेत तर काहींकडे वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे पंचाईत झाली आहे. बऱ्याच ज्येष्ठांचे हाल होत आहेत.